Chhtrapati sambhajinagar Crime Update : रिक्षाच्या धडकेत चिमुकला ठार

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः भरधाव रिक्षाच्या धडकेत एक वर्षाचा मुलगा ठार झाल्याची घटना सिडको महानगर कार्यालयाच्या परिसरात घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सुनील गेमा आर्य रा.सिडको महानगर 1 वाळूज, मुळगाव कुरमाबाद ता. शेंदवा जि. बडवानी राज्य मध्यप्रदेश यांनी फिर्याद दिली. 

फिर्यादीनुसार 4 सप्टेंबर रोजी सकाळी पावणे बारा वाजेच्या सुमारास फिर्यादी पत्नीसह सिडको महानगर कार्यालय पाठीमागे भाजीपाला खरेदी करीत होते. त्यांचा एक वर्षीय मुलगा शेजारीच खेळत होता. त्याचवेळी रिक्षा क्रमांक (एमएच 20 इके 0196) या लोडिंग रिक्षाच्या चालकाने भरधाव वेगात रिक्षा चालवून फिर्यादीचा मुलगा सविद सुनिल आर्य वय एक यास जोराची धडक दिली. यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून नाकातून व कानातून रक्त बाहेर आले. बेशुद्ध अवस्थेत त्याला घाटी अपघात विभागात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सिडकोच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः अधिकृतपणे कोणतीही परवानगी घेता सिडकोच्या जागेवर पत्राचे शेड उभारून मूर्ती ठेवल्या प्रकरणी आरोपींवर वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंदर दिनकर लाटे रा.साउथ सिटी वाळूज महानगर 2, भिकाजी ओमकार शिरसाट, शशिकांत काळे रा.सिडको वाळूज महानगर 1 साउथ सिटी, आर. जे. मुघल रा.साउथ सिटी वाळूज महानगर 2 तसेच योगेश थोरात, कृष्णा बोबडे, सतीश टिके, राजेंद्र पोळ रा.सर्व साउथ सिटी सिडको वाळूज महानगर 2 अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सिडकोच्या अधिकारी स्वाती निखिलेश पाटील यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 7 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान सिडको वाळुज नगर महानगर 2 साउथ सिटी येथील तिसगाव गट क्रमांक 116 मधील प्लॉट नंबर 24 च्या मोकळ्या जागेत आरोपींनी पत्र्याचे शेड उभारले. स्टेजवर मूर्ती ठेवून पूजा पाठ करून शासकीय जागेवर अतिक्रमण केले. सिडको ने दिलेल्या तोंडी आदेशाची अवहेलना केली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

रिक्षाच्या धडकेत पती-पत्नी जखमी

छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः अज्ञात रिक्षाच्या धडकेत स्कुटीवरील पती-पत्नी जखमी झाल्याची घटना जिमखाना समोर जालना रोड मुकुंदवाडी परिसरात घडली. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली कुंदन सदाफुले रा.अलंकार बिल्डींग पिसादेवी यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 20 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी या पतीसह स्कुटीवरून जात असताना जालना रोडवरील जिमखाना समोर अज्ञात रिक्षा चालकाने त्यांना पाठीमागून धडक दिली. या धडकेत फिर्यादीसह त्यांचे पती जखमी झाले. सिडको एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

वृद्धेच्या हातातील पाटल्या लंपास

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) ः चाळीसगाव कडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या हातातील 2 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या पाटल्या लंपास केल्या. ही घटना मध्यवर्ती बस स्थानकावर 5 सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज सुरेश टिंडगे रा. भटवाडी हनुमान मंदिरामागे अंबरनाथ वेस्ट ठाणे, सुमित गाडगे रा. उल्हासनगर ठाणे, राजेश गारुंगे रा. अंबरनाथ ठाणे अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी लताबाई कारभारी गायकवाड वय 65 रा. संभाजी कॉलनी साने गुरुजी शाळेजवळ कन्नड यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 5 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास फिर्यादी त्यांची भाची सून अर्चना रवी आहेर हिच्यासह चाळीसगाव कडे जाणाऱ्या बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन आरोपींनी फिर्यादीच्या हातातील सोन्याच्या पाटल्या लंपास केल्या. क्रांती चौक पोलीस पुढील तपास करीत आहेत.